BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : श्रीकुवरबाई छाजेड यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – स्व. श्रीकुवरबाई रतनचंदजी छाजेड यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड अध्यक्ष विरेश छाजेड व छाजेड परिवार यांच्या तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विजयकुमार छाजेड, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, अनंत कोऱ्हाळे, शरद लुणावत, संदेश गदिया, शुभम कटारिया, नंदकुमार लुणावत, सचिन धोका, धर्मेश कुमट, गौतमलब्धी फौंडेशन सेंट्रल कमिटी पुणेचे सचिव सुरेश गांधी, प्रमोद कटारिया, सुदेश भन्साळी आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच आरोग्य शिबिरात 100 पेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली. 75 लोकांची दंत तपासणी करण्यात आली. डॉ. रजत कुमट यांनी मोफत दंत तपासणी केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3