Pimpri: बोगस कामगार दाखवून बिले लाटल्याचा आरोप; चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मजूर पुरवठा करणा-या संस्थेने बोगस कामगार दाखवून जादा बिले लाटल्याचा आरोप करत संबंधित अधिका-यासह ठेकेदार संस्थेच्या चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास बिरादर यांनी मागणी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात बापदेव महाराज स्वंयरोजगार संस्थेमार्फत पाणीपुरवठा विभागात मजूर पुरवठा करण्यात येत होता. आजतागायत महापालिकेकडे मजूर पुरवठा करण्याचे काम केले आहे. संस्थेच्या ठेकेदाराने त्याच्या गावातील लोकांची नावे वापरुन 10 हून अधिक कामगारांच्या नावे महापालिकेकडून बिल अदा करुन घेतले आहे.

त्यामुळे बोगस कामगार दाखवून जादा रक्कम पालिकेची लाटली आहे. तसेच मजूराचे काम करणा-या सर्वांना केवळ आठ हजार रुपये देवून इतर रक्कम ठेकेदाराने लाटली आहे. कामगारांची पीएफ व ईएसआयची सर्व चलन तपासले असता ते खोटी कागदपत्रे आढळून आली आहे. सर्व कामगारांना किमान वेतनानुसार पगार दिलेल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.