Pimpri: खासदार बारणे लिखित ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघाची संपूर्ण माहिती असलेले ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (शनिवारी) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

आकुर्डी येथील हॉटेल ग्रॅन्ड अॅक्झाटिका येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच संपर्कप्रमुख बाळा कदम, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, मावळ जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, शिरुरच्या संघटिका सुलभा उबाळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर उपस्थित राहणार आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघ दोन जिल्ह्यामध्ये विस्तारला आहे. पुणे व रायगड जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत – खालापुर, उरण, पनवेल असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. या दोन्ही जिल्ह्यातील, राहणीमान, बोली भाषा, संस्कृती, विभिन्न आहे. घाटावरील व घाटाखालील असे दोन भाग येत असून गेल्या चार वर्षाच्या काळात खासदार बारणे यांनी या दोन्ही जिल्ह्यातील भागात प्रचंड मोठा जनसंपर्क ठेवला आहे. या मतदार संघातील महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारखाने, नद्या, क्रांतीकारकांचा इतिहास, देवालये, प्राचीन स्थळे, किल्ले, मार्ग, लोणावळा, खंडाळा, माथेरान ही पर्यटन स्थळे, JNPT पोर्ट, नव्याने होणारे विमानतळ याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे.

‘वैभवशाली मावळ मतदार संघ’ हे पुस्तक म्हणजे या मतदार संघातील संपूर्ण चित्र डोळ्यापुढे रहावे असे हे पुस्तक आहे. सर्वांना मतदार संघाची माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. या आगोदर ही बारणे यांनी ‘शब्दवेध’ ‘लढवय्या’ ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘वैभवशाली माझा मावळ लोकसभा मतदार संघ’ या पुस्तकाचे प्रकाशक जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे हे आहेत. तर, पुस्तकाची मूळ कल्पना लेखन हे स्वत: खासदार श्रीरंग बारणे यांचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.