Pimpri : ‘सुरक्षा से ,करो काम, दुर्घटना को दो विराम’ पॉकेटबुकचे प्रकाशन

एमपीसी न्यूज- डायनोमीटर निर्मिती करणाऱ्या भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोल कंपनीचे मनुष्यबळ प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी औद्योगिक सुरक्षा या विषयावर लिहिलेल्या ‘सुरक्षा से ,करो काम, दुर्घटना को दो विराम’ या पॉकेटबुकचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

यावेळी किर्लोस्कर ऑईल इंजिनचे व्यवस्थापकीय संचालक आर. आर. देशपांडे, सी.ए. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस.बी.झावरे, डायनोमर्क कंट्रोलचे व्यवस्थापकीय संचालक किशोर राउत, वर्थ इंजिनिअरींगचे संचालक नंदु कुलकर्णी, ट्विन इंजिनीरिंगचे संचालक प्रदीप भाळवंणकर, बजाज अँटोचे निवृत्त अधिकारी माधव जोशी, किर्लोस्करचे निवृत्त आधिकारी जी.आर. कुलकर्णी, जायभावे आदी उपस्थित होते.

उद्योग आणि उद्योगात काम करणाऱ्या विविध कामगारांना सुरक्षेबाबतचे ज्ञान देण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आगामी औद्योगिक सुरक्षा सप्ताह आपल्या दृष्टीक्षेपात ठेवून या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढते अपघात व आगीच्या घटना, कॉन्ट्रॅक्ट लेबरचे वाढते प्रमाण सुरक्षेबद्दल त्यांचे अपुरे ज्ञान त्यामुळे अपघात आणि आगीच्या घटना घडतात. त्यामुळे होणारे नुकसान राष्ट्रविकासाला बाधक ठरत आहे. सूर्यकांत मुळे यांनी आपल्या तीस वर्षाच्या विविध उद्योगाच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ही पुस्तिका लिहिली आहे.

ही पुस्तिका प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचली पाहिजे, कामगारांनी सदैव जवळ बाळगून ती वाचली पाहिजे. त्याचे अनुकरण केल्यास उद्योगातील अपघात नुकसान व आगी सारख्या घटना कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख दिलीप ईधाते, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, प्रिया लाड यांनी केले तर मान्यवरांचे आभार विशेष कार्यकारी अधिकारी अक्षरा राऊत यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.