Pimpri : ​बोपखेलच्या विकासकामांना आता नाही बसणार ‘खो’; प्रतिक्षा घुलेंना संयुक्त बैठकीत ठोस आश्वासन

एमपीसी न्यूज – आमदार ॲड.गौतम चाबुकस्वार यांनी पि.चि.मनपा.चे आयुक्त डाॅ.श्रावण हार्डीकर याच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकी दरम्यान गेले सात वर्ष गणेश नगर (बोपखेल) मधील टांगणीवर असलेला मुद्दा म्हणजे रीग रोड चा मुद्दा मार्गी लागला. या रीग रोडमध्ये अनेकांची घरे पडली मंदिर पडली. पण, हा 12 मीटर चा रोड काही झाला नाही.

पण, आज दिनांक 19/07/2019 रोजी युवती सेनाअधिकारी पिंपरी शहरांच्या प्रतिक्षा (ताई) घुले यांनी आज बैठकीत हा मुद्दा लाऊन धरला व यंत्रणा ती हलवली आणि हा रेंगाळलेला विषय आज मार्गी लावला. तसेच बोपखेल येथील महादेवाच्या मंदिरा समोरील घाट विस्तृत व्हावा जेणे करुन मंदिरात पाणी शिरणार नाही आणि प्रवाहातून येणारा राडारोडा मंदिर परीसरात थांबणार नाही. आधुनिक स्माशानभुमीची मागणी ही केली आहे.

  • तसेच बोपखेल परीसरातील आरक्षित भुखंड ताब्यात घेऊन विकसीत करावे अशी मागणी देखील करण्यात आली, याप्रसंगी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक नाना काटे, युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, दक्षता समिती सदस्य रवि कोवे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नितिन घोलप,विभाग संघटक निलेश हाके,युवानेते गोपाळ मोरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.