Pimpri Lockdown 4.0 Update: शहरातील बाजारपेठांतील निम्मी दुकाने उघडणार;  50 टक्के क्षमतेने PMPML बसही धावणार

Pimpri Breaking News: Decision to exclude Pimpri-Chinchwad city in red zone in the fourth phase of lockdownलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमध्ये वगळण्याचा निर्णय, उद्योगही पूर्ण क्षमतेने सुरु होणार

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमध्ये वगळण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता शहरातील बाजारपेठातील निम्मी-निम्मी दुकाने शुक्रवार (दि.22) पासून सम-विषम तारखांना उघडण्यास, उद्योगही पूर्ण क्षमेतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.  दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच असणार आहे. दुकाने सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून 26 मे पासून PMPMLच्या 50 टक्के क्षमतेने बस सुरु होणार आहेत. याबाबतची नवीन नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केली आहे.

महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात माहिती पुढीलप्रमाणे आहे.

लॉकडाऊन 4.0 अंतर्गत राज्य शासनाने 19 मे रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरास रेड झोनमधून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे 22 मे 2020 पासून शहरातील विविध अस्थापना, उद्योग व दैनंदिन व्यवहार सुरु करण्यासाठी सुधारित नियमावली आदेश जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत.

महापालिका आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे की, 

1) संपूर्णत: प्रतिबंधीत करणेत येत असलेल्या बाबी

  • केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय विमानप्रवास
  • मेट्रो रेल प्रवास
  • शाळा, कॉलेज , शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्‍लासेस
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट ( वैद्यकिय, पोलीस, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्टेशन, विमानतळ, अलगीकरण केंद्र याठिकाणीचे उपहारगृह चालू राहतील.)
  • सिनेमा हॉल , शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार , सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा
  • सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय, क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन व तत्सम प्रकारचे कार्यक्रम.
  • सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम, सभा, संमेलने बंद राहतील

2) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या हलचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहेत.

3) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्षे 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.

4) प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) – या कार्यालयाकडून वेळोवेळी घोषीत करणेत आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये वैद्यकिय सेवा, अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक वस्तू पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतूक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र ( कटेंनमेंट झोन ) विषयक महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

5) सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्मार्ट सारथी अ‍ॅप डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी. स्मार्ट सारथी अँप मध्ये कोव्हीड-१९ बाबत विविध मार्गदर्शक सूचना, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधाची दुकाने, महानगरपालिकेचे कोव्हीड-१९ फ्लू क्लिनिक या सोयीसुविधांची माहिती प्राप्त होते.

6) सर्व वैद्यकिय व्यावसायिक , परिचारीका,पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका यांना शहर, राज्य अंतर्गत आणि अंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी राहील.

7) सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक यांना वाहतुकीसाठी परवानगी राहील.

8) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात या आदेशामध्ये संपुर्णत: प्रतिबंधीत केलेल्या बाबी, विशेष आदेशाव्दारे प्रतिबंधीत केलेल्या बाबी वगळता इतर सर्व उपक्रम चालू ठेवण्यासाठी खालील अटीं व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देणेत येत आहे.

अ) परवानगी देणेत आलेल्या उपक्रमांना सुरु करणेसाठी शासकिय कार्यालयाकडून स्वतंत्रपणे परवानगी घेणेची आवश्यकता नाही.

ब) क्रीडा संकुले, स्टेडियम व खुली सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली राहतील. तथापि अशा ठिकाणी फक्त वैयक्तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळावयाचे खेळ उदा. योगासने, दोरीवरच्या उड्या इत्यादी यांना मुभा राहील. प्रेक्षक व सामुहिक उपक्रम, सांघिक
खेळ, खेळाचे साहित्य एका पेक्षा जास्त खेळाडूंनी हाताळावयाची शक्‍यता असलेले सर्व खेळ उदा. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, हॉकी इत्यादी यांना परवानगी असणार नाही. अशा ठिकाणी सामाजिक / शारिरीक अंतर ठेवणे बंधनकारक असेल.

क) सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक खालील प्रमाणे सुरु करता येईल.

  •  दुचाकी – चालक
  •  तीन चाकी – चालक व दोन व्यक्ती
  • चारचाकी – चालक व दोन व्यक्ती

ड) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रात दि. 26/05/2020 पासून पीएमपीएमएलच्या बसच्या 50 टक्के एवढ्या क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करता येईल. तसेच प्रवासा दरम्यान प्रवाशांनी शारीरिक अंतराचे पालन करावे.

इ) सर्व बाजारपेठातील दुकाने सकाळी ९ .०० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान सुरु राहतील. तथापि सदर ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक / शारिरीक अंतर राखण्याचा निकषाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा / दुकाने तात्काळ बंद करणेत येतील.

फ) 1) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्वे औद्योगिक आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहणेसाठी सर्व रेड झोन क्षेत्रांमधून येण्यासाठी महानगरपालिकेकडून पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. उर्वरित भागातील प्रतिबंधीत क्षेत्र ( कन्टेंनमेट झोन) वगळता सर्व नागरिकांना पूर्व परवानगीशिवाय कामावर उपस्थित राहता येईल.

2) औद्योगिक आस्थापना 100 टक्के कामगार क्षमतेसह सुरु ठेवता येतील. तथापि सर्व खाजगी कार्यालये व माहिती तंत्रज्ञान विषयक आस्थापना जास्तीत जास्त 50 टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील व उर्वरित मनुष्यबळाव्दारे शक्य असेल तोपर्यंत घरातून कामकाज (Work From Home) करणेस प्राधान्य द्यावे.

ग) विनिर्दिष्ठ बाजारपेठांमधील दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळात सुरु राहतील तथापि त्यासाठी P1- P2 तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुस-या बाजूची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. त्यामुळे अटी व शर्तीमुळे बाजारपेठामध्ये गर्दी टाळणे शक्‍य होईल व पर्यायाने कोविड- 19 चा वेगाने होऊ शकणा-या प्रसारास प्रतिबंध घालता येईल.

ह) 1) चिंचवड स्टेशन 2) पिंपरी कॅम्प , साई चौक, शगुन चौक 3) गांधी पेठ चाफेकर चौक चिंचवड 4) काळेवाडी मेनरोड (एम एम स्कूल ते काळेवाडी नदीवरील पूल) 5) अजमेरा पिंपरी 6) मोशी चौक, मोशी आळंदीरोड 7) महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप 8) डांगे चौक ते काळेवाडी फाटा 9) भोसरी आळंदीरोड 10) कावेरीनगर मार्केट 11) कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक 12) दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक साईबाबा मंदिर

वरील बाजारपेठांमधील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील तथापि, त्यासाठी P1, P2 तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेस उघडी राहतील. व दुस-या बाजूची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. सदर बाजारपेठामध्ये ज्या बाजूची दुकाने सुरु असतील त्याच्या विरुध्द बाजूस वाहनांचे पार्किंग करणेत यावे जेणेकरुन सुरु असलेल्या दुकानां समोरील जागा शारिरीक/ सामाजिक अंतराच्या निकषांसह ग्राहकांना वापरता येईल. वरील बाजारपेठा वगळता शहराच्या उर्वरित भागातील दुकाने सर्व दिवस सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरु राहतील. दुकाने सुरु करणेसाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता राहणार नाही.

9) कोवीड -19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये दंडनीय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील. सदर आदेश लॉकडाउन 4.0 मध्ये दि. 22 मे 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत पिंपरी – चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

कंटेनमेंट झोनबाबत आदेश  

1. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागांचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत.तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.

2. प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) मनपा द्वारे चालविण्यात येणारी अथवा परवानगी दिलेली फिव्हर क्लिनीक वगळता अन्य बाह्मरुग्ण विभाग व खाजगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवण्यास प्रतिबंधीत करण्यात येत आहे.

3. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बॅकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवाव्यात तसेच आपली एटीएम केंद्रे पूर्णवेळ कार्यान्वीत ठेवावीत.

4. प्रतिबंधित क्षेत्रात सदर काळात सकाळी 10 ते दुपारी 2 या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.

5 प्रतिबंधित क्षेत्रात सदर काळात मटण व चिकन यांची किरकोळ विक्री ही या पूर्वी मनपाने दिलेल्या आदेश क्र.भूजिं/02/ कावि/220/2020 दि. 16 एप्रिल 2020 नुसार सकाळी 10 ते दुपारी 2 या कालवधीतच सुरु राहील.

कंटेनमेंट क्षेत्रात सदर काळात अत्यावश्यक इतर सामान जसे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री सुद्धा सकाळी 10 ते दुपारी 2 या कालवधीतच सुरु राहील.

कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित भागासाठी आदेश

1. पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील उक्त आदेशातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य क्षेत्रातील सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने यांना सदर आदेशातून वगळण्यात येत असून ती संपूर्ण कालावधीकरीता खुली राहतील.

2. शहरात मटण व चिकन यांची किरकोळ विक्री ही या पूर्वी मनपाने दिलेल्याआदेश क्र.भूजिं/02/ कावि/220/2020 दि. 16 एप्रिल 2020 नुसार सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत सुरु राहील.

3. अत्यावश्यक सामान जसे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री शहरात सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत सुरु राहील.

4. सदर काळात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालवधीतच दूध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील. या संदर्भात यापूर्वी भाजीपाला व फळे विक्री संबंधाने निर्गत केलेले आदेश क्रमांक भुजि/2/कावि/217/2020, दि. 15/04/2020 नुसार सदर विक्री नमूद केलेल्या ठिकाणी सुरु राहील. किरकोळ भाजी विक्रेते यांना प्रभाग अधिका-यांनी पास दिल्यानंतरच नमुद करुन दिलेल्या जागेवरच भाजी/ फळे विक्री करता येईल. अन्य पथारी विक्रेते अथवा फेरीवाले यांना किरकोळ सामान विक्री त्यांना प्रभाग अधिका-यांनी पास दिल्यानंतरच नमुद करुन दिलेल्या जागेवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करता येईल. कोणत्याही हातगाडीवर खाद्य पदार्थांची विक्री अनुज्ञेय राहणार नाही. चहा, पान व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद ठेवण्यात येईल.

5. शहरातील दुकाने, नागरी वसाहतीतील दुकाने, नागरी संकुलातील दुकाने सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजूला सम आणि डाव्या बाजूला विषम या तारखेप्रमाणे सुरु राहतील. परंतु नागरीक सामाजीक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील सर्व बाजारपेठा / दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील.

6. जीवनावश्यक तथा अन्य वस्तूंचे (E-Commerce), औषधांचे व तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या कालवधीतच मनपाच्या पूर्व मान्यतेने पास घेवून अनुज्ञेय राहील. सदर सुविधेकरीता फक्त मनपाच्या अधिका-याव्दारे निर्गमीत करण्यात आलेला पास ग्राहय धरण्यात येईल.

7. अत्यावश्यक सेवांकरिता यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास दि. 21 मे पर्यंत लागू राहातील.

8. मोशी कृषि उत्पन्न बाजार समिती बाबत मा.विभागीय आयुक्त, पुणे यांनी पारित केलेले आदेश कायम लागू राहतील. बाजार समितीतील व्यवहारांना सदरच्या आदेशामधून वगळण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणांसाठी नियम

1) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
2) सार्वजनिक ठिकाणी थुंकणेस सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कार्यवाहीस पात्र राहील.
3) सार्वजनिक ठिकाणी दोन गज इतके अंतर राखणे बंधनकारक राहील.
4) लग्न समारंभामध्ये सामाजिक अंतर राखून जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी राहील.
5) अंत्यविधी कार्यक्रमासाठी सामाजिक अंतर राखून जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी राहील.
6) सार्वजनिक ठिकाणी गुटखा, पान तंबाखू खाणेस व मद्यपानास सक्त मनाई राहील.
7) सर्व दुकानामध्ये दोन्ही ग्राहकामध्ये सुरक्षित अंतर 6 फुट राखणे बंधनकारक राहील.
8) ज्या आस्थापनांमध्ये शक्‍य असेल तोपर्यंत घरातून कामकाज (Work From Home) करण्यास प्राधान्य द्यावे.
9) सर्व कार्यालये , दुकाने , कारखाने, व्यापारी आस्थापना इत्यादी ठिकाणी कामाच्या वेळेचे सक्त पालन करावे.
10) इमारतींमध्ये आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या करिता व्यवस्था करणेत यावी.
11) संपूर्ण कार्यालयामधील सार्वजनिक जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग जसे की दाराचे हॅन्डल इत्यादीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे.
12) कार्यालय प्रमुखांनी कार्यालयामध्ये सार्वजनिक अंतर , कार्यरत कर्मचा-यामध्ये योग्य अंतर , दोन शिफ्ट मध्ये पुरेसा वेळ , जेवणाचे सुट्टीचे नियोजन योग्य प्रकारे होईल याची दक्षता घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.