Pimpri : ‘तुझे हातपाय तोडतो’, म्हणत तरुणावर कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘काही लोक मला मारहाण करत असताना तू माझ्या भांडणात पडून मला का वाचवले नाही. आता तुला कोण वाचवितात ते मी पाहतो’, तुझे हातपाय तोडतो, असे म्हणत एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजता सेनेट्री चाळ पिंपरी येथे घडली.

विशाल मनोज लोट (वय 23, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हर्ष उर्फ लड्या अमर बहोत (वय अंदाजे 18, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी लोट सेनेट्री चाळ येथे दुर्गामाता मंदिराजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी हर्ष तिथे आला. ‘भाटनगर येथे काही लोक मला मारहाण करीत होते. त्यावेळी तू तेथे हजर असताना तू माझ्या भांडणामध्ये पडून मला का वाचवले नाही, असे म्हणत हर्ष याने लोट यांना शिवीगाळ केली.

‘आता मी तुझे हातपाय तोडणार आहे. तुला आता कोण वाचवितात ते मी पाहतो’ अशी धमकी देत हर्ष याने लोट यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात लोट यांच्या गाल, कान आणि डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.