Pimpri : मंडई परिसरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या दोन घटना

वाहनाचा मालक न सापडल्याने गुन्हा दाखल नाही

एमपीसी न्यूज – भाजी मंडई परिसरात पिंपरी पुलावर पार्क केलेल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या. तर चार दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 2) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. गुन्हा मात्र केवळ जाळपोळीबाबत दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्यानचंद अर्जुनदास रोहिरा (वय 66) होंडा ऍक्‍टिव्हा, ओमप्रकाश ललवाणी (वय 33) यांच्या होंडा पॅशन आणि ऍक्‍टिव्हा आणि अक्षय श्‍यामराव उबाळे यांची युनिकॉन दुचाकी पिंपरीतील बी ब्लॉकमध्ये उभी होती. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कोणीतरी या दुचाकी जाळून टाकल्या.

पोलिस उपनिरीक्षक संतोष डोलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मंडईकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर रिक्षा थांब्याजवळ इको आणि फियाट या दोन मोटारी अनेक दिवसांपासून पार्क करून ठेवल्या होत्या. काही टवाळखोरांनी शनिवार पहाटे गाड्यांच्या काचा फोडल्या. हा प्रकार लक्षात आला असता नागरिकांनी पिंपरी पोलिसांना माहिती दिली. मात्र, याप्रकरणी कोणीही फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाही. तसेच त्यातील एका वाहनाचा मालक सापडला नसल्याने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसून याचा पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.