Pimpri : किर्गीस्तानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 900 विद्यार्थ्यांना भारतात परत आणा – रविराज साबळे

एमपीसी न्यूज – कोरोना या साथीच्या आजारांचा सर्व जगात झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे सर्व देशांत लॉकडाऊन करून त्याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या आजाराची भीषणता पाहिल्यास परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे किर्गीस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 900 विद्यार्थ्यांना भारतात परत आणा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष रविराज साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

किर्गीस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मायदेशी परतण्यासाठी विनंती केली आहे. एमबीबीएस शिक्षणासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील एकूण 17,500 विद्यार्थी किर्गीस्तानमध्ये अडकून पडले आहेत. तेथे त्यांना जेवण आणि राहण्याची गैरसोय होत असल्यामुळे आरोग्याची काळजी वाटत आहे. त्यामुळे भारतीय दूतावासाला संपर्क साधून आम्हाला मायदेशी परत आणावे, अशी विनंती व्हिडिओच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील एकुण 900 विद्यार्थी या देशात अडकून पडले आहेत. त्यामुळे केंद्रीय स्तरावर उपाययोजना करवी, अशी मागणी रविराज साबळे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.