Pimpri : मुलाला ओरडल्याच्या रागातून भावजयला केली मारहाण

एमपीसी न्यूज – मुलाला ओरडल्याच्या (Pimpri) रागातून दिराने आणि त्याच्या पत्नीने भावजयला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

विकी महेश वाल्मिकी, त्याची पत्नी (दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : आळंदीमध्ये श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बाईक रॅली

पोलिसांनी दिलेल्या (Pimpri) माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दिराच्या दहा वर्षीय मुलाने घरासमोर कागद कचरा केला. त्यामुळे फिर्यादी पुतण्याला ओरडल्या. त्या कारणावरून विकी आणि त्यांच्या पत्नीने फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी यांच्या मुलीच्या हातावर मारून तिलाही जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.