_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या नियोजित इमारतीसाठी निधी उपलब्ध करणार- आमदार जगताप

एमपीसी न्यूज – मोशी येथील नियोजित पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या जागेच्या निधी संदर्भात व नेहरूनगर न्यायालयात आवश्यक असणाऱ्या फर्निचर साठी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प विषयक बैठकीत निधी मंजूर करणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. आमदार जगताप व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यामध्ये आज, शनिवारी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 20 डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या सूचनेनुसार सूचित जागा न्यायालयास 5 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यास मान्यता देण्यात आली. लवकरात लवकर नवीन इमारतीचे नकाशे तयात करण्याच्या सूचना देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन मोशी येथील पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जागेचे भूमिपूजन करण्यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, सचिव अॅड. गोरख कुंभार, सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, सदस्य अॅड. निलेश ठोकळ व अॅड. हर्षद नढे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.