Pimpri : अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दीवर्ष साजरे करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद

महामंडळाचे अध्यक्ष गोरखे यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यानिमित्त अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी त्यांचे आभार मानले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मंगळवारी (दि. 18) मांडलेल्या अर्थसंकल्पात अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम राबविण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अमित गोरखे म्हणाले, ”साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचे आम्ही आभारी आहोत. या निधीचा योग्य उपयोग केला जाईल. वर्षभर समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातील. महाराष्ट्रभर समाजप्रबोधनपर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उपक्रम राबविण्यात येतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.