Pimpri: बंगल्यावरील सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह, महापालिका आयुक्त ‘होम क्वारंटाईन’

Bungalow security guard positive, Municipal Commissioner 'Home Quarantine'

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील निवासस्थानी कार्यरत असलेला सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आयुक्त हर्डीकर ‘होम क्वारंटाईन’ झाले आहेत. त्यांचे नमुने तपसाणीसाठी पाठविले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिपोर्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील रुग्ण संख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे. महापालिका कर्मचा-यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे.

आजपर्यंत 25 ते 30 महापालिका कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये वैद्यकीय, आरोग्य, सुरक्षा रक्षक, अभियंता, कर संकलन  विभागातील कर्मचा-यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा मोरवाडीत सरकारी ‘अविष्कार’ बंगला आहे. त्यांच्या बंगल्यासमोर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाच्या वडिलांना  कोरोनाची बाधा झाली होती. सुरक्षारक्षकासह कुटुंबियांचे रिपोर्ट रविवारी पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आयुक्त हर्डीकर सोमवारपासून होम क्वारंटाईन आहेत.

तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या देखील आयुक्त संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी आज घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. आता आयुक्तांचे रिपोर्ट काय येतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

”मी होम क्वारंटाईन आहे. घरातून काम करत आहे. आज घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत”, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like