Pimpri : शहरात चार ठिकाणी चोरी; 44 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड शहरात चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोबाईल हिसकावणे, घरफोडी, टपरी फोडण्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी निगडी, हिंजवडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माधवी प्रदीप पुराणिक (वय 41, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माधवी त्यांच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप पाहत होत्या. त्यावेळी आरोपीने त्यांचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला.

नंदकिशोर विश्वनाथ कुमार (वय 70, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कुमार यांचा ध्रुव बंगला लॅच लॉक लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने खिडकीचे लोखंडी गज उचकटून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील लाकडी कपाटात ठेवलेले 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

_MPC_DIR_MPU_II

ताथवडे येथील कार्तिकेय बिल्डिंगवर मोबाईल फोनचा टॉवर आहे. 15 ते 20 मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी टॉवरचे कुलूप तोडून त्यातून दहा बॅटरी चोरून नेल्या. चोरटयांनी रिक्षामधून (एम एच 12 / जे एस 4219) या बॅट-या चोरून नेल्या आहेत. अशी फिर्याद हरिबा दत्तू राजाराम (वय 57, रा. आकुर्डी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बालाजी गोरख सपाटे (वय 30, रा. आंबेडकर नगर, लांडेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सपाटे यांची भोसरी भाजी मार्केटच्या समोर मोबाईल रिपेअरिंगची टपरी आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी टपरीचा पत्रा उचकटून दुरुस्तीसाठी आणलेले चार मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह, हेडफोन, चार्जर, डेटा केबल, स्पीकर, मेमरी कार्ड, ब्ल्यूटूथ असा एकूण 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना वाढत आहेत. नागरिकांनी सेफ्टी लॉक आणि आधुनिक पद्धतीची सुरक्षा यंत्रणा लावावी. संशयित व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.