BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सोने आणि हिर्‍यांच्या दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे घेऊन चोरटे पसार

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या घरात घुसून घरातून सोन्याचे हिऱ्याचे दागिने तसेच महागड्या वस्तूंसह आर्मी कॅन्टीन कार्ड, हॉस्पिटल कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, मतदान ओळखपत्र, गॅस कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली. एकूण पाच लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 14) पहाटे चारच्या सुमारास काळभोर नगर येथे उघडकीस आली.

रत्नकांत शिवराम भोसले (वय 59, रा. काळभोरनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नकांत सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॅचलाॅक तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटाचे ड्रावर उचकटून सोन्याचे हिऱ्याचे 157.5 ग्रॅम वजनाचे पाच लाख 89 हजार रुपये किमतीचे दागिने व घड्याळ तसेच आर्मी कॅन्टीन कार्ड, हॉस्पिटल कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, मतदान ओळखपत्र, गॅस कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली. रत्नकांत मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ पिंपरी पोलिसात गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3