Pimpri : पिंपरी, मोशी, सांगवीत घरफोड्या; तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी, मोशी आणि सांगवी परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तीन घटनांमध्ये एकूण तीन लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

पहिली घटना संत तुकाराम नगर पिंपरी येथे उघडकीस आली. मयूर विष्णू जाधव (वय 24) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचे घर 22 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ ते दुपारी तीन या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. घरातून 70 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना मोशी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 11 मध्ये उघडकीस आली. दीपक सुभाष खत्री (वय 37) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खत्री मोशी प्राधिकरण मधील सेक्टर क्रमांक 11 येथे सुखवाणी ओएएसआयएस रो हाऊस मध्ये राहतात. खत्री 15 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता घर बंद करून बाहेरगावी गेले. अज्ञात चोरट्यांनी घराच्या टेरेसचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून दोन लॅपटॉप आणि दोन मोबाईल असा 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 16 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाचार वाजता उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तिसरी घटना सांगवीमध्ये विशालनगर पिंपळे निलख येथे उघडकीस आली. अरुणा नागेशराव कुंबळेकर (वय 58) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंबळेकर यांचे घर 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील खालच्या मजल्यावरील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि 42 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.