Pimpri : शटर उचकटून सिगारेट चोरणा-यास अटक

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून दुकानातून रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे चोरणा-या चोरट्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी मोहननगर येथे चारभुजा हॉटेल व आर के प्लाय या दुकानात घडली.

विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय 26, रा. पिंपरी गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप धनराज मेवाड (वय 32, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप यांचे मोहननगर येथे चारभुजा हॉटेल व आर के प्लाय ही दोन दुकाने आहेत. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास त्यांनी दोन्ही दुकाने कुलूप लावून बंद केली. रात्री आरोपी विकास याने दोन्ही दुकानांचे शटर वाकवून उचकटले. त्याने दुकानातील अडीच हजार रोख रक्कम आणि दोन हजार रुपये किमतीची सिगारेटची पाकिटे असे एकूण साडेचार हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलिसांनी विकास याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.