Pimpri : पिंपरी गावात दोन फ्लॅटमध्ये घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दोन फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून तसेच लॅचलॉक तोडून चोरट्यांनी दोन लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी पिंपरी गावातील वाघेरे कॉलनी येथे उघडकीस आली.

संदीप शंकर मुळीक (वय 33, रा. स्टोनरीज सोसायटी, वाघेरे कॉलनी, पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वा आठ ते शनिवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान फिर्यादी मुळीक यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून, लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील पाच तोळे 700 मिलिग्रॅम वजनाचे एक लाख 71 हजार रुपयांचे दागिने आणि नऊ हजार रुपयांची रोख रक्‍कम असा एकूण एक लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला.

तसेच फिर्यादी मुळीक यांच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहणारे सुनील अशोक पवार यांच्याही घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आतील 30 हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दोन्ही घटनांमध्ये एकूण दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like