Chinchwad : पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी – राकेश जैन

एमपीसी न्यूज – व्यापार व्यवसाय झपाट्याने बदलत आहे त्यामुळे पारंपरिक व्यवसायाला वाढवायचे असेल तर आधुनिकतेची कास धारावी लागेल असा सल्ला प्रसिद्ध बिजनेस डेव्हलपमेंट मार्गदर्शक राकेश जैन यांनी व्यापारी बांधूना दिला. शिवजयंती निमित्त आयोजित “बदलोगे तो बढोगे” या बिजनेस डेव्हलपमेंट सेमिनार मध्ये गुरुवारी चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये ते बोलत होते.

भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे आयोजित “बदलोगे तो बढोगे” बिजनेस डेव्हलपमेंट सेमिनार गुरुवार (दि 19) चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये पार पडला. या सेमिनारमध्ये बदलते तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यापार या संबंधित बिजनेस डेव्हलपमेंट मार्गदर्शक राकेश जैन यांनी मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसाय कसा वाढवावा तसेच व्यवसायातील ताण, तणाव व अडचणीना कसे सामोरे जावे या विषयी उपस्थिताना त्यांनी मार्गदर्शन केले. तरुण पिढीला पारंपरिक व्यवसायाची आवड निर्माण करून त्यांना व्यवसाय करण्यास उद्युक्त करावे. तसेच सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायाचा प्रचार व प्रसार कसा करावा याचे उदाहरण देत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष विरेश छाजेड, शुभम कटारिया,, संदेश गादिया, मनोज शेलोत, नयन शहा आदी उपस्थित होते.  प्रकाश कटारिया व राजेंद्र सुराणा यांनी आभार प्रदर्शन केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like