BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पूरग्रस्तांसाठी उद्योजक उमेश चांदगुडे यांची सव्वादोन लाखांची मदत; 1500 कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यावर आलेल्या संकटामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पूरग्रस्तांना मदत म्हणून उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या वतीने सव्वादोन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच 1500 कुटुंबियांना पुरेल एवढे संसारोपयोगी साहित्य दिले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे मदतीचा धनादेश उमेश चांदगुडे यांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला. यावेळी अशोक चांदगुडे, वीरेंद्रसिंह शितोळे, चंद्रकांत गायकवाड उपस्थित होते.

  • त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 1500 कुटुबियांना पुरेल एवढे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. ब्रिक्स इंडिया या कंपनीच्या वतीने एक ट्रकभर संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे.

या जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळत चालली आहे. पाणी कमी होत आहे. त्यामुळे आता स्वच्छतेची आवश्यकता आहे. त्यासाठी पूरग्रस्त परिसराची स्वच्छता करण्यासाठी कुशल मनुष्यबळदेखील पाठविण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3