Pimpri: ‘एचए’ कंपनीकडून औषधे खरेदी करा; खासदार बारणे यांची महापालिका आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनासाठी लागणारी औषधे,  साहित्य  ‘एचए’ कंपनीकडून खरेदी करावीत, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोना बाधित रुग्णांनी दोनशेचा आकडा गाठला आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य लागत आहे. आपल्या शहरात केंद्र सरकारची औषध निर्माण करणारी ‘एचए’ कंपनी आहे. या कंपनीने आजपर्यंत अनेक औषधांची निर्मिती केली आहे.

‘एचए’ कंपनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लागणारे पीपीई किट,  मास्क,  इन्फ्रेड थर्मोमिटर आणि हेल्थ कोसॉकची निर्मिती करत आहे.  त्याचा पुरवठा देखील केला जात आहे.  पिंपरी महापालिकेने ‘एचए’ कडून हे वैद्यकीय साहित्य खरेदी करावे. महापालिका रुग्णालयापासून कंपनी हाकेच्या अंतरावर आहे.

त्यामुळे जलदगतीने वैद्यकीय साहित्य उपलब्ध होईल. कोरोनाविरोधातील लढाईला वेग येईल. त्याकरिता महापालिकेने कोरोनाविरोधातील लढाईसाठी लागणारे साहित्य ‘एचए’ कंपनीकडूनच खरेदी करावे, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे. त्यामुळे कंपनीला देखील याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.