Pimpri : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नगरसेवक बाबू नायर यांच्याकडून मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – भाजपचे शहर सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक बाबू नायर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. भाजपचे कार्यकर्ते गणेश शिर्के यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नायर यांनी आर्थिक मदत केली. वाढदिवसाचा खर्च टाळून शिक्षणासाठी मदत केल्याने नायर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोरवाडी येथील नायर यांच्या कार्यालयात सुलोचना गणेश शिर्के यांना 11 हजार रुपयांचा धनादेश सुपुर्त करण्यात आला. यावेळी नगरसेवक केशव घोळवे, माऊली थोरात, मनोज तोरडमल, सलीम शिकलगर, विनोद मालू, योगेश कदम उपस्थित होते.

  • गणेश शिर्के भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले आहेत. तिघेही शिक्षण घेत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या मुलांच्या शिक्षणाला मदत व्हावी. त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू नये. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यांना पुढील शिक्षणासाठी देखील सहकार्य करणार असल्याचे बाबू नायर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.