Pimpri: ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहन, महापालिकेला ‘कॉल’ करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, संस्थांना ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र वाहन उपलब्ध करुन दिले आहे. ही सुविधा ऑन कॉल तत्वावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेला फोन केल्यास कचरा उचलण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहराचे दोन भाग करत उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.

या दोन्ही कंत्राटदारांमार्फत घरोघरचा कचरा गोळा करण्यासमवेत ई-कचरा संकलनाची देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत यासाठी स्वतंत्र वाहन देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ही सुविधा ऑन कॉल तत्वावर उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी, संस्थानी ई-कचरा उचलण्यासाठी या कंत्राटदारांकडे मागणी करावी. त्यानंतर कचरा उचलण्याकरिता वाहन उपलब्ध करुन देण्यात येईल.

शहरातील नागरिक, संस्था, गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या परिसरा, सोसाट्यांमध्ये ई-कचरा असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्यधिकारी यांना दुरध्वनीद्वारे सूचना देऊन ई-कचरा उचलण्यास सांगावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ई-कचरा उचण्यासाठी वाहन हवे असल्यास यांच्याशी संपर्क साधा!
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी एम.एम. शिंदे 9922501914, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी के.डी.दरवडे 9922501998, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी बी.बी.कांबळे 9922501869, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी व्ही.के.बेंडाळे 9922501877, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी आर.एम.भाट 9922501882, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी डी.जे.शिर्के 9922501876, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी एस.एस.कुलकर्णी 9922501875 आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आरोग्यधिकारी डी.एस.सासवडकर यांच्याशी 9922501896 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.