Pimpri : मुंबईमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराला पाचारण करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – मुंबईत कोरोना विषाणूबद्दल कोणतेही गांभीर्य नागरिक घेताना दिसत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्केटमध्ये सदैव झुंबड उडालेली दिसते. वेळोवेळी पोलीस प्रशासनाने सूचना देऊनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. इटली व स्पेन या देशात कोणत्या नागरिकाला वाचवायचे हे आता डॉक्टर ठरवीत आहेत. अशी परिस्थिती प्रगत देशांमध्ये निर्माण झाली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे तेथील प्रशासनाचे सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही व सोशल डिस्टन्ससिंगचा अभाव. त्यामुळे मुंबईतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला पाचारण करावे, अशी सूचना माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.

याबाबत बाबर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेला पत्रात म्हटले आहे कि, सरकार मार्फत सुरुवातीपासूनच कोरोनाकडे गांभीर्याने बघितले घेतले गेले व त्याच्यावर ठोस उपाय योजना राबवल्या गेल्या. माध्यमांद्वारे, वृत्तपत्र, प्रशासनामार्फत वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात आल्या. परंतु असे असताना मुंबईतील नागरिकांकडून केंद्राच्या व राज्याच्या सूचना काटेकोरपणे पालन होताना मुंबईमध्ये दिसत नाही. म्हणून मुंबईमध्ये लष्कराला पाचारण करण्याची वेळ आली आहे. परिस्थिती जर आटोक्याबाहेर गेली तर आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होईल, अशी भीती बाबर यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी केली. नागरिकांनी स्थानांतर करू नये, अशा सूचना देखील राज्य सरकारतर्फे वेळोवेळी देण्यात आल्या. यासाठी जिल्हा स्थलांतर बंदी केली मजूर, कष्टकरी यांना निवाऱ्याची सोय केली. तरीही महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची मुंबईतील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दीमुळे मुंबईमध्ये अधिक संसर्ग वाढू नये म्हणून ठोस कडक कारवाईची करण्याची वेळ आता आली आहे.

मुंबईत भाजीपाला, दूध ,धान्य ,जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी होणारी गर्दी पाहता सध्या मुंबईतील नागरिकांवर कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे. त्यासाठी अर्धसैनिक बल किंवा लष्कराला पाचारण करण्याची वेळ मुंबईमध्ये आली आहे. तसेच जीवनाश्यक वस्तू चौकाचौकात उपलब्ध करून व सोशल डिस्टेंसिंगवर भर देण्यात यावा. मुंबईतील परिस्थिती हाताळण्या करता हीच ती वेळ असल्याचे बाबर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like