Pimpri : संसदेत पोरकटपणा चालत नाही – मधुकर बाबर

काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर मध्ये घुमला 'महायुतीचा विजय असो'चा नारा

एमपीसी न्यूज – देशाच्या संसदेत काम करत असताना, देशाच्या विकासाची धोरणे ठरवत असताना अनुभव, अभ्यास आणि हुशारी लागते. कसलेही स्टंट करून संसदेचे काम करता येत नाही, असे माजी नगरसेवक मधुकर बाबर म्हणाले. काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर भागात शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीकडून पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी अमित गोरखे, योगेश बाबर, गजानन चिंचवडे, नगरसेवक केशव घोळवे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, प्रदीप साळुंखे, अविनाश पाटील, महेश माने, हनुमंत गवई, संजय तोरकडे, अजित भालेराव किरण भोईटे, जुन्नर पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, नाना काळभोर, अमित बाबर, शारदा बाबर, विशाल यादव, मोहिनी यादव, प्रकाश शिंदे, मोहिनी टेकवडे, डॉ. दिपाली गायकवाड, संजय मानुरकर, अशोक ढोकणे, गिरीश जगगिधे, तुळशीराम काळभोर, वसंत काळभोर, विजय गुप्ता, प्रवीण शिंदे, अतुल इनामदार, किरण काळभोर, अमर दौंडकर, रियाज शेख, सुनील काटे, अनिल काटे, प्रशांत मोहिते, श्रीपती खुणे, अजिंक्य इनामदार, कपिल चौधरी, संगीता काळभोर, किशोर शेलार, गणेश जगपात, गणेश चव्हाण, प्रवीण गाडे, राजेंद्र मोहिते, सागर देवकाते, विक्रम साळवी, अथर्व ठाकर, प्रथमेश मुंडे, अवि मुरकुटे, अविनाश उकिरडे आदी उपस्थित होते.

काळभोर नगर मधील राष्ट्रतेज तरुण मंडळाला भेट देऊन प्रचार दौ-याची सुरुवात झाली. पारंपारिक पद्धतीने सनई चौघड्याच्या तालात बारणे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी नगरसेवक दिगंबर काळभोर, शंकर काळभोर, आजम खान, विजय गुप्ता, सतीश काळभोर, संतोष काळभोर, मोहिनी टेकवडे, मीनल यादव, डॉ. समीर लोखंडे, निलेश मुथा, अण्णा अलंकार आदींच्या निवासस्थानी भेट दिली. जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, सूर्योदय कॉम्प्लेक्स, शंकर शेट्टी उद्यान, शिवदर्शन कॉलनी, दत्तनगरमधील दत्त मंदिर, विद्यानगर येथील हनुमान मंदिर, शिवशंभो फाउंडेशन, राजर्षी शाहू मित्र मंडळ अष्टविनायक गणेश मंदिर, शाहूनगर मधील साईमंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

माजी उपमहापौर दिनकर दातीर पाटील यांच्या कार्यालयात जाऊन खासदार बारणे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून येणा-या लोकसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी खासदार बारणे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

मधुकर बाबर म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकांमध्ये राहून त्यांच्या अडचणी समजून घेऊन काम केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराने आपल्या कामाचा ठसा देशाच्या लोकसभेत उमटवला आहे. संसदेत त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. असे असताना पोरांचा पोरकटपणा इथे चालणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी खासदार बारणे यांच्यासारखा हुशार, अनुभवी उमेदवारालाच पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायला हवे.”

खासदार बारणे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवणार आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या माताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य या निवडणुकीत मिळणार आहे. केवळ बालहट्ट म्हणून जर ही निवडणूक काही लोक लढवत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतेच नाही. महायुतीच्या उमेदवारासाठी नागरिकांमध्ये उत्साह आहे. नागरिकांना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला जनता निवडून देणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.