Pimpri: कॅनरा बँकेतील कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह; 15 जण क्वारंटाईन, बँकेची शाखा बंद

Canara Bank employee report positive; 15 people quarantined, bank branch closed

एमपीसी न्यूज – पिंपरीतील कॅनरा बँकेतील एका कर्मचा-याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील बँकेतील 15 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील लक्षणे असलेल्या 4 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या रिपोर्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोमवारपासून बँकेच्या पिंपरी शाखेचे कामकाज बंद करण्यात आले आहे. त्यामुळे खातेदार बँकेत येवून कामाविना परत जात आहेत. त्यांचा हेलपाटा होत आहे. तर कर्मचारी पॉझिटिव्ह आलेली ही शहरातील पहिलीच बँक आहे.

पिंपरी चौकात कॅनरा बँकेची शाखा आहे. या शाखेत दिघी परिसरातील एक कर्मचारी कार्यरत आहे. त्याला त्रास होत होता.

त्यामुळे त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट रविवारी (दि. 7) पॉझिटीव्ह आले आहेत.

या कर्मचाऱ्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कर्मचा-याच्या संपर्कात आलेल्या बँकेतील 15 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्यातील लक्षणे असलेल्या 4 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठिवण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट काय येतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सोमवारपासून बँकेच्या शाखेचे कामकाज बंद आहे. कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण होणारी शहरातील पहिलीच बँक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी आज मंगळवारी बँक परिसरात औषध फवारणी केली.

दरम्यान, बँकेतील खातेदार बँकेत येत आहेत. मात्र, बँक बंद असल्याने त्यांचा हेलपाटा होत आहे. लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर पूर्णक्षमतेने बँकासह विविध कार्यालये सुरु होत आहेत.

कार्यालयातील एखादा कर्मचारी पॉझिटीव्ह आला की पूर्ण कार्यालयच क्वारंटाईन करावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.