Pimpri: सीएसआर फंडाचे परिपत्रक रद्द करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर फंडाची रक्कम मुख्यमंत्री फंडात न देता पंतप्रधान फंडासाठी द्यावे, असे राज्याची अडवणूक करणारे परिपत्रक काढले आहे. यातून केंद्र सरकारच्या संकुचित प्रवृत्तीचे प्रदर्शन घडल्याचा आरोप करत वाणिज्य मंत्रालयाने हे पत्रक तत्काळ रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

यासंदर्भात भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आपत्तीत राज्य सरकार उत्तम काम करत आहे. कोरोनाग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात  औषधे, महागडे साहित्य, उपकरणे लागणार आहेत. स्थलांतरित मजूर, कामगार, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या रोजच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था राज्य सरकार करत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोषात निधी जमा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. त्यानुसार
सहकार खात्याने परिपत्रक काढून राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा प्रधानमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

या उलट केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील कंपन्यांनी  सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर फंडाची रक्कम मुख्यमंत्री फंडात न देता पंतप्रधान फंडासाठी द्यावे असे राज्याची अडवणूक करणारे परिपत्रक काढले आहे. याद्वारे केंद्राच्या संकुचित प्रवृत्तीचे दर्शन घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.