Pimpri: पाणी कपात रद्द करा; मानवी हक्क संरक्षण समितीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणी कपात करण्याचा आयुक्तांनी घेतलेला निर्णय अनाठायी आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. “धरण उशाला, कोरड घशाला”अशी शहरातील नागरिकांची अवस्था झाली आहे. पाणी कपात करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात जोगदंड यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात एकदिवसा आड पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय अनाठायी चुकीचा आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आसतांना असा निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचा आहे. आज”धरण उशाला, कोरड घशाला”अशी पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांची परीस्थिती झाली आहे.

आयुक्तांना एवढी नागरीकांची काळजी असेल तर पाणी गळती थांबवावी, त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच अनाधिकृत नळजोड घेण्याऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करून अनाधिकृत नळजोड आधिकृत करावेत. ज्या विभागात यापुढे अनधिकृत नळजोड होईल त्या विभागातील आधिकाऱ्यांना जबाबदार धरावे.

आपल्या या अप्रिय निर्णयामुळे पाणी आसतांना मानवनिर्मित पाणी टंचाईला समोर जावे लागेल. यामुळे राजकीय लोकांची टँकर लाँबी सक्रिय होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल.त्यामुळे आपण अशा अप्रिय घेतलेला निर्णय मागे घ्यावा. नागरिकांची पाणी कपातीतून सुटका करावी आणि प्रशासकीय पातळीवर आपण योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

निवेदनावर उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, संगिता जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.