Pimpri: मोटार पार्क करण्यावरुन खराळवाडीत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – मोटार पार्क करण्यावरुन भांडण झाल्याने टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री खराळवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पिंपरीतील खराळवाडी येथे शुक्रवारी रात्री मोटार पार्क करण्यावरुन भांडणे झाली. एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला धक्‍का लागला. यामुळे टोळक्‍याने धुडगूस घालत खराळवाडी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तीन वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न केला.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.