Pimpri : नेहरूनगर येथे कार जळाली

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथे रस्त्याने जात असलेल्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 29) दुपारी तीनच्या सुमारास खराळवाडी-नेहरूनगर रस्त्यावर महिंद्रा कंपनीजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिका कार शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास खराळवाडीकडून नेहरुनगरच्या दिशेने जात होती. कामगारनगर येथील महिंद्रा कंपनीसमोर कार आली असता कारने अचानक पेट घेतला. इंजिनमधून धूर निघून कार पेटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर येथील एक बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.