Pimpri : कारची सुरक्षा भिंतीला धडक, अपघातानंतर गाडी जळून खाक

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील संभाजीनगर चौकात कार एका (Pimpri) सुरक्षा भितींला धडकली. या अपघातात कारने पेट घेतला असून ती जळून खाक झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) रात्री अडीचच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र व प्राधिकरण उप अग्निशमन केंद्रांच्या गाडी घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एम. एच. 12. जी वाय. 7008, फोक्सवेगन वेंटो (Volkswagen Vento) हि गाडी पेट घेतली आहे असे आढळून आले.  प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्राचे, मुख्य अग्निशामक विमोचक संजय महाडिक यांनी  सदर गाडीवर होजरील होजच्या साह्याने पाणी मारून आग पूर्णपणे विझवली व कुलिंग करून घेतले तसेच त्यांच्या मदतनीस अनिल माने (अग्निशामक विमोचक), शुभम पिंपळे (ट्रेनि सब ऑफिसर) आणि निरंजन लोखंडे (ट्रेनि फायरमन) होते.

Talegaon Dabhade : एनएमआयईटी मध्ये निरोप समारंभ संपन्न

सदर आगवर्दी वर कुठलीही व्यक्ती जखमी झाली नाही. सर्व नागरिक सुखरूप असल्याची खात्री अग्निशमन दला कडून करण्यात आली.

संबंधीत गाडीच्या मालकाचे नाव कळू शकलेले नाही. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार मनोहर व्हीला बंगला च्या भिंतीला सदर गाडी ठोकली गेली आहे त्यामुळे बंगल्याच्या वॉल भिंतला खड्डा पडल्याचे आढळून आले आहे.

ही कामगिरी प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्रातून गौतम इंगवले (उप अग्निशामक अधिकारी), संपत गौंड ( प्रमुख अग्निशामक विमोचक), संजय महाडिक ( प्रमुख अग्निशामक विमोचक), श्रीहरी धुमाळ (वाहन चालक), अनिल माने (अग्निशामक विमोचक),  शुभम पिंपळे (ट्रेनि सब ऑफिसर) आणि निरंजन लोखंडे (ट्रेनि फायरमन) यांनी (Pimpri) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.