Pimpri : मेडिकल दुकानातून रोकड लंपास

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 22 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी साडेसहाच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे उघडकीस आली.

अरविंद हिम्मतराव पुरोहित (वय 25, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद यांचे भाटनगर पिंपरी येथे श्रीसाई मेडिकल दुकान आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी मेडिकल दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 22 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.