Pimpri: पेट्रोल पंपावरील ऑपरेटरला धमकावून रोकड पळवली

Pimpri: Cash was stolen by threatening the operator at the petrol pump चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणा-या ऑपरेटर सद्दाम चाऊस याला चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवला

एमपीसी न्यूज- पेट्रोल पंपावर काम करणा-या ऑपरेटरला कोयत्याचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी पाच हजारांची रोकड पळवली. ही घटना रविवारी (दि.21) सकाळी घडली.

गणेश अण्णा मोहिते (वय 42, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल काळूराम शिंदे, रोहन माणिक जाधव (दोघे रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), किरण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तीन आरोपी दुचाकीवरून फिर्यादी मोहिते काम करत असलेल्या पेट्रोल पंपावर आले.

चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणा-या ऑपरेटर सद्दाम चाऊस याला चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि त्याच्या हातातील पाच हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like