Pimpri: ‘कोरोना’मुळे खबरदारी, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये दंड!

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या धुकींद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी बस, रेल्वेस्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास 150 रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे.

जीवघेणा कोरोना विषाणू महाराष्ट्रात दाखल झाला आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात देखील पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे. बाधित व्यक्तींच्या धुकींद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी बस, रेल्वेस्थानक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पूर्णपणे टाळावे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये दंडात्मक कृत्य आहे. या कृत्यापोटी 150 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार शहरात होऊ नये याकरिता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. थुंकल्यास आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. 150 रुपये दंड वसूल केला जाईल, असा इशारा वैद्यकीय विभागाने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.