Pimpri : महापालिका माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसविणार; दोन कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी 11 लाख 43 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यास शुक्रवारी (दि. 12)स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 24 माध्यमिक विद्यालये आहेत. मराठी माध्यमाचे 18 आणि उर्दू माध्यमाची सहा विद्यालये कार्यरत आहेत. या माध्यमिक विद्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर, कॉमटेक टेलीसोल्यूशन आणि वैभव टेक सोल्यूशन या तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या.

फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 11.25 टक्के सर्वात कमी दराची निविदा होती. त्यामुळे ही निविदा स्वीकारण्यास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी 10 जुलै 2019 रोजी मान्यता दिली. त्यानुसार फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदाराकडून दोन कोटी 11 लाख 43 हजार रुपयांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून घेण्यात येणार आहेत. ठेकेदारासोबत करार नामाकरण्यास स्थायी समितीने शुक्रवारी आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.