Pimpri: महापालिकेच्या मिळकतींवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवा; महापौरांच्या सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व मिळकतींवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, भाजी मंडई, भोसरी कुस्ती केंद्र यांना भेटी देतेवेळी महापौर जाधव यांनी सूचना दिल्या. नगरसेविका अनुराधा गोफणे, प्रियांका बारसे, निर्मला गायकवाड, नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस, सागर गवळी, लक्ष्मण उंडे, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट , कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रवीण घोडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, सहाय्यक आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, उद्यान अधीक्षक डी.एन.गायकवाड उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या भोसरी सहल केंद्र, नव्याने विकसित होत असलेले भोसरी कुस्ती प्रशिक्षण केंद्र, भोसरी भाजी मंडई, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन व्यायमशाळा, सखुबाई गवळी उद्यान, कारंजे, व्यायामशाळा, ध्यानमंदिर, प्रभाग क्रमांक पाच मधील बॅडमिंटन हॉल, गंगोत्री पार्क उद्यान, दिघी क्रीडा मैदान, दिघी येथील नव्याने विकसित होत असलेली पाण्याची टाकी, संत समूह शिल्प प्रकल्प च-होली, इत्यादी ठिकाणी महापौर जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, उद्यानातील कारंजे दुरूस्त करणे, ट्री गार्ड काढणे, क्रीडांगणे विकसित करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.