Pimpri : शहरात बुध्दपोर्णिमा विविध कार्यक्रमाने साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी, दापोडी, भोसरी, काळेवाडी, शाहूनगर-चिंचवड बुध्द विहारमध्ये शनिवारी बुध्द पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रवचन, बुध्दवंदना आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

रावजी बारणे प्रशाला थेरगाव येथील साईराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रावजी बारणे प्रशाला येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी बारणे, नारीशक्ती संघटनेचे अध्यक्ष पूजा सराफ, माजी नगरसेविका उषा चोरडिया, गिरीजा सराफ, शबनम सय्यद, रेहान हुसेन व पर्यावरण जल संवर्धन समितीचे अध्यक्ष मुजफ्फर इनामदार ,जलतज्ञ रामदास जंगम आदी उपस्थित होते.

  • संत तुकारामनगर येथील धम्मदूत मैत्री संघाच्या बुध्द विहारात बुध्दमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थायलंड येथुन ही साडेचार फूट उंचीची मूर्ती आणण्यात आली. यावेळी सम्राट अशोक नागरी सहकारी पतसंस्थेचे डॉ. अशोक शीलवंत, जीवन बच्छावस क्रांती खोब्रागडे, प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अनिल सूर्यवंशी, बौध्द विकास महासंघाचे अध्यक्ष शरद जाधव आदी उपस्थित होते.

दापोडी येथील धम्मचक्र प्रवर्तन महाविहारात सकाळी बुध्द वंदना घेण्यात आली. त्यानंतर अमरावती येथील जयामणी यांचे प्रवचन झालेय महाविहाराच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अनेकांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी शरणगमन प्रक्रियेतील धम्ममित्रांसाठी मार्गदर्शक अभ्यासिका या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

  • त्रिरत्न बौध्द महासंघाचे अध्यक्ष धम्मचारी संघभद्र म्हणाले, दापोडीतील बुध्दविहारात तांब्याच्या कलशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. या अस्थिंसाठी बुध्दांशू माटे यांनी चांदीचा कलश भेट दिला आहे. तसेच या दिवशी पुणे जिल्हयातून अनेक भागांतून सर्वधर्मीय नागरिक या विहारात वंदन करण्यासाठी येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.