BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शहरात विविध उपक्रमांद्वारे गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ‘गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः’ची अनुभूती घेत पिंपरी-चिंचवडकरांनी आपल्या गुरूप्रतिचा आदरभाव विविध उपक्रमांद्वारे व्यक्त केला. तसेच विविध शाळांमध्ये देखील गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी केल्याचे दिसून आले.

रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तात्या शिनगारे, पोलीस अधिकारी सुरेश भालेराव योगेश शिनकर, अर्पण सूर्यवंशी, मुख्याध्यापिका श्रीविद्या रामेश व संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

  • “आपण सर्वजण कोणाचे तरी शिष्य आहोत. या भावनेने एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपंरपरेत गुरुशिष्याच्या जोड्या प्रसिध्द आहेत. गुरुंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेणे भरून येते. तेव्हा आपले आपल्या मुखातून आपोआपच शब्द बाहेर पडतात.” असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

यावेळी शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गेवारे आणि प्रणाली मगर यांनी केले. आभार सचिन परिहार याने केले.

  • भोसरी एआयडीसी तील डायनोमर्क कंपनीत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. कंपनीतील विभागप्रमुख शांताराम पाटील तसेच सर्व कामगारांनी एकत्र येऊन दत्ताची महाआरती केली. ज्या गुरुकडून आपण विद्या प्राप्त करतो किंवा मिळवतो. त्यांच्याबद्दल आदराने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा.

गुरुपौर्णिमा दिवस म्हणजे शिष्यांचा जीवनांत मिळवलेले ज्ञान, विद्यारुपी प्रकाश होय. गुरुशीष्याच्या अनेक जोडया प्रसिद्ध आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपले वडील बंधू निवृत्तीनाथ महाराज यांना गुरू मानले. नामदेवांनी विसोबा खेचर यांना गुरु मानले. भगवान श्रीकृष्णाने आपल्या गुरुच्या घरी लाकडे फोडली. एकलव्यची गुरूनिष्टा पाहिली तर आपण नतमस्तक होतो, असे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी सांगितले. यावेळी जोगदंड यांनी गुरुपौर्णिमा का साजरी करतात? याचे महत्त्व सांगितले.

  • इलेक्ट्रॉनिक विभागाच्या वतीने आयोजन केले. प्रत्येक कामगारांनी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांना नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली .त्यांनी ही सर्वांना आर्शिवाद दिले. यावेळी मनुष्यबळ विकास विभागप्रमुख सूर्यकांत मुळे, विभागप्रमुख दिलीप ईधाते, अक्षरा राउत, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, प्रविण बाराथे, मोहन कृष्णन ,राजेश वैद्य, हर्षल शेळके, रवि भेंनकी, स्वप्निल देशपांडे, पंडित वनसकर, प्रिया देशमुख, राजेंद्र गोराने, जयंत राउत शांताराम पाटील, केतकी राउत आदींनी सहभाग नोंदवला.

शमीम हुसेन फोंडेशन संचालित मारुंजी येथील वेलकम स्कूलमध्ये आज गुरु पौर्णिमा निमित्ताने मारुंजी गावाचे सरपंच पूनम बुचडे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मारुंजी गावाचे उपसरपंच संदीप जाधव प्रमुख उपस्थित होते

  • तसेच मारुंजी गावाच्या सरपंचपदी नवनियुक्ती झाल्याने शाळेच्या वतीने सरपंच पूनम बुचडे आणि उपसरपंच संदीप जाधव यांचा सत्कार शाळेच्या संचालिका शबनम सय्यद यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन केला.

या कार्यक्रमप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते, मनपा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड विजेते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी वेलकम स्कूल करिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकृती पुतळा भेट म्हणून दिला. यावेळी शाळेच्या वतीने शिक्षिका नीता यांनी त्यांचे आभार मानले.

  • तसेच यावेळी गुरुपौर्णिमा निमित्त महात्मा फुले सामाजिक समता परिषदचे संस्थापक कलिंदर शेख यांनी वेलकम स्कूलकरिता सरस्वतीची प्रतिमा भेट दिली

यावेळी मारुंजी गावाच्या सरपंच पूनम बुचडे यांनी शाळेत होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करीत मुलांना शाळेत योग्य प्रकारे शिक्षण मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त करीत मुलां-मुलींना योग्य शिक्षणासोबतच योग्य शिस्त आवश्यक असल्याचे सांगत शाळेमध्ये आणखी सुधारणा व विकास करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या पुढील कार्यास शुभेच्छाहि दिल्या.

  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका नीता वाघोले, पूनम रावन, नाहिद खान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीता वाघोले यांनी केले तर, शिक्षिका नाहिद खान यांनी आभार मानले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3