Pimpri : उद्योगनगरीत कामगा्र दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उदयोगनगरीत कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, प्रभारी आयुक्त संतोष पाटील, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेविका शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापरीक्षक अमोद कुंभोजकर, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सह शहर अभियंता राजन पाटील, प्रवीण तुपे, मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आशा राऊत, स्मिता झगडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, रविंद्र पवार, प्रविण घोडे, नितीन देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उद्यान अधिक्षक डी.एन. गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, सोमनाथ साबळे, प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशिला जोशी आदी उपस्थित होते.

  • पिंपळे सौदागर येथील हभप. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी शाळेत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची विविध वेशभूषा परिधान केली होती. शाळेच्या संस्थापकांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून महाराष्ट्र दिनाचे आणि कामगार दिनाचे महत्व समजून सांगितले.विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त विविध गाणी सादर केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, सविता आंबेकर, सर्व शिक्षक, पालक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कोरे व कीर्ती कान्हेरे यांनी केले. तसेच कार्तिकला गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

  • टीयुसीसी महाराष्ट्र राज्याच्या वतीने १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन एमआयडीसी भोसरी येथील कामगार नेते दादा रुपमय चटर्जी चौक येथे साजरा करण्यात आला.

टीयुसीसी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी संभाजी शिंदे यांनी दादा रुपमय चटर्जी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी संभाजी शिंदे, विलास टकले, आर डी कांबळे, प्रमोद मोरे, अजय गडकरी, माणिकराव सस्ते व बबन भोर यांनी मनोगत व्यक्त केले.

  • कामगारांनी एकत्र येऊन कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले तसेच कामगार दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. ज्या कामगारांनी लढा देऊन बलिदान दिले त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे ”महाराष्ट्र दिन चिरायू होवो” अशा घोषणा देऊन, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास संजय सुर्वे, अमोल साळवे, आत्माराम खेतले, के के लातूरवाला, नीलेश शिनलकर, दीपक गौड, बाळासाहेब तांबे,नायड, बाळू ठाकूर तसेच एम आय डी सी वर्कर्स युनियन, महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना, पूना वर्कर्स युनियन, ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज युनियन देहूरोड, अँम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियन खडकी या कामगार संघटनांचे सभासद बहू संख्येने उपस्थित होते. काळेवाडी तापकीरनगर येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबिटी इंग्लिश मेडियम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  • यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भाषणे व पोवाडे सादर केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सतिश घरत होते. यावेळी माजी नगरसेविका अनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, युवा नेते सोमनाथ तापकीर, संस्थेचे संचालक राजू पवार, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन बापू बल्लाळ केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.