Pimpri : शहरात स्वामी समर्थांचा प्रगटदिन भक्तीभावाने साजरा

एमपीसी न्यूज – ‘श्री स्वामी समर्थ…..जय स्वामी समर्थ’चा जयघोष. पहाटेपासून विविध मठ मंदिरामध्ये स्वामींच्या उत्सवमूर्तीवर अभिषेक, पूजा अर्चा आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करत रविवारी शहर व उपनगरांत श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वामी समर्थांच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मठ व मंदिरामध्ये महाप्रसादासाठी शिधा देण्यात येत होता. व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडियावरुनही भाविक एकमेकांना स्वामी समर्थ प्रगटदिनाच्या शुभेच्छा देत होते.

  • शहरातील स्वामी महाराज मंदिरात गायन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजिले होते. पहाटे स्वामींच्या मूर्तीस लघुरुद्राभिषेक झाल्यानंतर प्रगट दिनाचे कीर्तन झाले. सायंकाळी आरती मंत्रजागर आणि स्वामींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. सार्वजनिक मंडळासह विविध संस्थानी यानिमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.