Pimpri: अंध, अपंग संस्थेत विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरीतील अंध व अपंग विकास असोसिएशन या संस्थेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी संस्थापक अध्यक्ष दिनकर गायकवाड, प्रदिप गायकवाड, चंद्रकांत सहाणे, विजय गिरमे, राहुल बोरा, अनिल देशमुख, यशवंत कव्हेरे, डॉ. स्वप्नाली सांडभोर, प्रसाद म्हस्के, विकास कर्जाळ, महिमा शर्मा, विनोद गिरी, डी.जे.डाके, व्ही.व्ही.गिरमे, ए.व्ही.दांडवे, रुमाना खान, स्वेतल सांडभोर, प्राची साली, हरेश दुतंडे, रोशनी पाटील, सीमा जाजू, पुजा वाघ, अमन मुलानी उपस्थित होते.

डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे कौतुक केले. यशवंत कव्हेरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रदिप गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.