Pimpri : शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज – पती-पत्नीचे नातं सात जन्म टिकावे, यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सर्वच सु‌वासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. परिसर अशा ठिकठिकाणी असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी आणि त्याला सूत बांधण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे सौभाग्यवतींनी पूजा केली. आज दुपारी दोननंतर पौर्णिमा लागली असल्याने सोळा श्रृंगार करीत, सौभाग्याचे लेणं लेवून मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पोहचल्या. अपार्टंमेंटमध्ये राहणाऱ्या सुवासिनींनी बाजारातून वडाची फांदी आणून घरीच किंवा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, मोकळ्या पटांगणात पूजा केली.

  • पूजेदरम्यान वडाच्या झाडाला सुवासिंनींनी सात फेरे मारीत धागा बांधला. त्यानंतर तिथे उपस्थित ब्राह्मणांना दान-दक्षिणा देत इतर सुवासिनींनी सौभाग्याचं लेणं हळद-कुंकू लावून, आंब्यांचे वाण देऊन ओट्या भरल्या. थोडा वेळ वडाच्या सावलीत बसून त्यानंतर घराकडे प्रस्थान ठेवले.

नवविवाहितांसह ज्येष्ठ महिलांचाही उत्साह
एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी आई, आजी सासु, सासु यांच्या समवेत नव्या पिढीतील सुवासिनींबरोबरच नववविवाहितांनी देखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले. सात जन्म याच सख्याची साथ लाभू दे म्हणून वयाने, मानाने मोठ्या असलेल्या सुवासिनींच्या पाया पडत आशीर्वाद उखाणे देखील घेतले. एकंदरच सकाळपासूनच वडाच्या भोवती सुवासिनींनी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास तुरळक गर्दी होती. पारंपरिक पद्धतीने सर्वत्र वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.