Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील सेलिब्रेटींनीही बजावला मतदानाचा हक्क (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – शूटिंगमधून वेळ काढून पिंपरी चिंचवडमधील सेलिब्रिटीजनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

पिंपरी-चिंचवडच्या सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी शूटिंगच्या वेळापत्रकातून आवर्जून वेळ काढून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर सोशल मीडियावर सेल्फी, व्हिडिओ टाकून या कलाकारांनी मतदान करण्याला प्रोत्साहन दिले.

पार्श्वगायिका सावनी रवींद्र, तिचे वडील रवींद्र घांगुर्डे, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री प्रियंका यादव या कलाकारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर सर्व कलाकारांनी नागरिकांना उद्देशून मतदान करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. राजकारणात पक्ष असले, तरी जी व्यक्ती विकासासाठी काम करेल, जात-धर्म-पंथ यामध्ये न विभागता सर्व समाजाला एकत्र घेऊन वाटचाल करेल, अशाच व्यक्तीची निवड करा, असाही संदेश या कलाकारांनी दिला. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहनही काही कलाकारांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिले.

अभिनेता भूषण प्रधान म्हणाला,”आज शूटिंगची तारीख होती पण मतदानाची तारीख कळल्यानंतर शूटिंग पुढे ढकलण्यात आले. देशाला व राजकीय नेत्याला आपण खूप नावे ठेवतो. पण आपण आपला मतदानाचा हक्क आपण विसरतो. त्यामुळे मतदानाला महत्व द्या” असे आवाहन त्यांनी केले.

गायिका सावनी रवींद्र म्हणाली, ” मी हक्क बजावला तसा प्रत्येकाने भारतीय असल्याचा हा हक्क बजावलाच पाहिजे. ही मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीचा उत्सव आहे तो सगळ्यांनी मिळून साजरा करावा. आम्ही जरी सेलिब्रेटी असलो तरी मतदान केले. तुम्ही ही करा”

अभिनेत्री प्रियंका यादव म्हणाली,” मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावा. आम्ही सेलिब्रेटी असलो तरी मतदान करुन मग अन्य कामे करत आहोत. मतदान ही काही पसंती नाही. मतदान ही जबाबदारी आहे. सगळ्यांनी वेळ काढून मतदान करा”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, ” या निवडणुकीत परिवर्तन नक्कीच घडेल. पिंपरी-चिंचवडकरांचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे. पुण्याच्या हिशोबाप्रमाणे पिंपरी-चिंचवडला जास्त टक्केवारी आहे. पिंपरी-चिंचवडकर असल्याचा मला अभिमान आहे” मी सामान्य नागरिक म्हणूनच राहणार असल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

अभिनेता सौरभ गोखले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.