Pimpri : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने सिमेंटच्या गट्टूने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी मिळून एकाला सिमेंटच्या गट्टू आणि लथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली.

जय विठ्ठल इंगळे (वय 32, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल खरात (वय 19), वैभव हातागळे (वय 20), अमोल पिल्ले उर्फ आबु (वय 20, सर्व रा. गांधीनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपिंनी त्यांच्या मित्राला दारू पिण्यासाठी फिर्यादी इंगळे यांच्याकडे पैसे मागितले. पैसे देण्यासाठी इंगळे यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपींनी इंगळे यांना सिमेंटच्या गट्टू आणि लथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये इंगळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like