Pimpri :  कोरोना प्रतिबंधासाठीसाठी उपयुक्त साहित्य तसेच वस्तूंवर केंद्राने GST लावू नये – गजानन बाबर

The Center should not impose GST on materials and items suitable for corona ban - Gajanan Babar

एमपीसी न्यूज –  कोरोना प्रतिबंधासाठीसाठी उपयुक्त  मास्क, सॅनीटायझर, फोर हेड थरमाॅमीटर, पीपीई किट अशा वस्तूंवर केंद्राने GST लावू नये,  अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत बाबर यांनी या उपयुक्त वस्तूंवर GST न आकारण्याची मागणी केली आहे. बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे की,  दोन महिन्यांपासून घरातच अडकून पडलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे  त्यांना  आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस आणि कंपनीतील कामगार यांना या  सुरक्षात्मक साहित्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असते.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिक आणि फ्रंट लाईन कामगार यांना मास्क, सॅनीटायझर, फोर हेड थरमाॅमीटर, पीपीई किट व इतर आवश्यक साहित्यांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे, तसेच आर्थिक अडचणींचा देखील नागरिकांना सामना करावा लागतो आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने या वस्तूंवर GST शुल्क आकारु नये, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.