Pimpri: स्थायी समितीची दुस-या आठवड्यातही सेंच्युरी; 110 कोटीच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. समितीच्या आणखीन पाच सभा होणार आहेत. स्थायीने विकासकामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. सलग दुस-या आठवड्यात स्थायी समितीने विकासकामांना मंजुरी देण्याची सेंच्युरी केली आहे. आज पार पडलेल्या सभेत सुमारे 109 कोटी 58 लाख 77 हजार रुपयांच्या कामांना स्थायीने मान्यता दिली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात सुमारे 116 कोटी 51 लाख रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. रहाटणी परीसरामध्ये रस्त्यांचे क्रॉकीटीकरण (13 कोटी 44 लाख), तापकीरनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (11 कोटी 68 लाख), प्रभाग क्रमांक दोनमध्ये माध्यमिक शाळा इमारत बांधणे (12 कोटी 28 लाख), बोऱ्हाडेवाडी येथे शाळा इमारत बांधणे (11 कोटी 75 लाख), दिघीत शाळा इमारत बाधणे (11 कोटी 79 लाख), चिंचवड लिंकरोड बाजूकडील एम्पायर एस्टेट उड्डाणपुलाखाली स्थापत्य विषयक कामे करणे ( 9 कोटी 23 लाख), प्रभाग क्रमांक 14 मधील विवेकनगर, तुळजाई, भागातील डी.पी.रस्त्याचे मजबुतीकरण करणे (तीन कोटी 35 लाख) रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंतचा 18 मीटर रुंद रस्ता विकसित करणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामांसाठी (75 लाख), मैलाशुद्धीकरण केंद्र, पंपीग स्टेशन मधील विद्युत पुरवठा पुर्ववत करणे ( 81 लाख), ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 23 व 24 मधील ड्रेनेज लाईन स्थलांतरीत करणे (67 लाख), ड प्रभागातील नदीच्या कडेने असलेल्या गुरूत्व वाहिनीचे देखभाल दुरूस्ती करणे ( 38 लाख), किर्तीनगर भागातील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल व दुरुस्ती करणे (46 लाख), निगडीतील विद्युत दाहिनीची देखभाल करणे (34 लाख), प्रभाग क्रमांक 15 मधील मनपा इमारतीची देखभाल दुरूस्तीची कामे, फर्निचर व्यवस्था करणे (28 लाख),

प्रभाग क्रमांक पाचमधील गवळीनगर व सँडविक कॉलनी परीसरात बंद पाईप गटर व स्थापत्य विषयक कामे करणे (47 लाख), सांगवी केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 31 रामनगर, व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे (46 लाख), आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक 14 दत्तवाडी, विठ्ठलवाडी, परिसर इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण सुधारणा कामे करणे (32 लाख), प्रभाग क्रमांक सहा मधील नाशिक हायवेच्या पुर्वेकडील भागात मलनि:सारण नलिकांची कामे करणे (36 लाख), थेरगाव मधील रस्त्यावरील रुंदीकरणातील व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत मंडळाचे लघुदाब/उच्चदाब खांब, तारा व फीडर पिलर हलविणे (28 लाख), प्रभाग क्रमांक 14 मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणे (26 लाख) अशा एकूण 109 कोटी 58 लाख 77 हजार रुपयांच्या कामांना स्थायी समिती सभेत मान्यता देण्या आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.