Pimpri: महापालिकेच्या स्थायी समितीची सेंच्युरी!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने विकासकामांना मंजुरी देण्याची सेंच्युरी केली आहे. प्रभाग क्रमांक ‘एक’मधील डीपी रस्ता विकसित करणे 12 कोटी, प्रभाग क्रमांक ‘आठ’मधील 12 मीटर रस्ता विकसित करणे आठ कोटी, प्रभाग 22 मधील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करण्यासाठी पाच कोटी अशा एकूण 116 कोटी 51 लाख रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रेफ्रिजरेशन व एयर कंडीशनिंग मेकॅनिक या व्यवसायाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी (चार कोटी 70 लाख), प्रभाग क्रमांक आठमधील तिरुपती चौक येथील तुलसी हाईट्स समोरील रस्ता ते पेठ क्रमांक एक ला नाशिक हायवे पर्यंत जोडणारा 12 मीटर डीपी रस्ता विकसित करणे ( सहा कोटी 82 लाख), प्रभाग क्रमांक 22 मधील ज्योतीबानगर येथील बाजीप्रभु चौक ते तापकीरमळा रस्त्याचे क्रॉकीटीकरण करणे ( पाच कोटी 41 लाख) प्रभाग क्रमांक 31 मधील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणे ( तीन कोटी 37), प्रभाग क्रमांक 31 मधील क्रांती चौक ते शनी मंदीर पर्यंतच रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणे ( तीन कोटी 29 लाख), प्राधिकरण, गंगानगर भागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरण करणे ( पाच कोटी 75 लाख) रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 19 मधील अंतर्गत रस्ते मजबुतीकरण/ सुधारणा/ नुतनीकरण/ स्टॅंप कॉक्रीटींग अद्यावत पद्धतीने करणे ( तीन कोटी 11 लाख), दुर्गा कॉर्नर ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हा रस्ता मजबुतीकरणासाठी ( सहा कोटी 58 लाख), प्रभाग क्रमांक 31 मधील ढोरे फार्म ते फेमस चौक रस्ता युटीव्हीटी पद्धतीने विकसित करणे ( तीन कोटी 37 लाख), पिंपरी संत तुकारामनगर येथील उपरस्ते विशेष पद्धतीने विकसित करणे ( तीन कोटी 29 लाख), प्राधिकरण एडीसी परिसरातील रस्ते युटीव्हीटी पद्धतीने विकसित करणे ( पाच कोटी 24 लाख), आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उर्वरित अनुषंगिक विद्युत विषयक कामे करणे ( तीन कोटी 79 लाख), चिखलीतील 24 मीटर डीपी रस्ता विकसीत करणे ( नऊ कोटी 41 लाख)

प्रभाग क्रमांक 15 मधील गणेश तलावामधील गाळ काढणे (42 लाख), चिखलीतील शेलारवस्ती व सोनवणेवस्ती परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे ( 55 लाख), चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्रमांक दोन येथे चिखली गावठाण, कुदळवाडी, बालघरेवस्ती, पवारवस्ती, पेठ प्रभाग क्रमांक 16 मोशी, बोऱ्हाडेवाडी, संजयगांधीनगर, बोऱ्हाटेवस्ती येथे आवश्यकतेनुसार जुन्या मलनि:सारण नलिका बदलणे (55 लाख), कृष्णनगर, शिवतेजनगर व हरगुडेवस्ती परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे (62 लाख), चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधील चिंचवड गावठाण, रस्टन कॉलनी, लक्ष्मी नगर, यशोपुरम व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारण करणे (51 लाख), प्रभाग क्रमांक दहा मध्ये महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे सुशोभिकरण करणे व अनुषंगिक कामे करणे ( 1 कोटी 63 लाख) अशा एकूण 116 कोटी 51 लाख रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.