Pimpri: …अन्‌ विलास मडिगेरी स्थायी समिती सभापती झाले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड कौटुंबिक कारणामुळे आज (मंगळवारी)झालेल्या सभेला अनुउपस्थित राहिल्या. त्यामुळे अनुभवी आणि वरिष्ठ या नात्याने स्थायी समिती सभापतीपद भुषविण्याची संधी विलास मडिगेरी यांना मिळाली. त्यांनी एका दिवसात 93 कोटीच्या खर्चाच्या विकास कामांना मंजुरी देत विक्रम केला. औटघटकेचे का होईना सभापतीपद मिळाल्याने मडिगेरी यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना मिळाले. त्यानंतर दुस-या वर्षाच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रबळ दावेदार असतानाही गटातटाच्या राजकारणामुळे ऐनवेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना पदाने हुलकाविणी दिली. त्यांच्याऐवजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या पिंपळे निलखच्या नगरसेविका ममता गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागली. त्यांच्या हाती महापालिकेच्या आर्थिक चाव्या गेल्या.

निष्ठावान असूनही डावलल्याने नाराज न होता, कोणतीही तक्रार न करता विलास मडिगेरी यांनी समितीत कामकाजाला सुरुवात केली.  सभापती गायकवाड यांची पहिलीच टर्म असल्याने मडिगेरी त्यांना वेळोवेळी मदत करतात.

सभापती ममता गायकवाड आज कौटुंबिक कारणामुळे सभेला अनुउपस्थित राहिल्या. त्यांच्या अनुउपस्थितीत अनुभवी आणि वरिष्ठ या नात्याने स्थायी समिती सभापतीपद भुषविण्याची संधी विलास मडिगेरी यांना मिळाली. त्यांनी खेळी-मेळीच्या वातावरणात सभेचे कामकाज पार पाडले. कोणताही वाद न घालता विरोधकांना देखील बोलण्याची संधी दिली. आजच्या सभेत तब्बल 93 कोटीच्या शहरातील विकास कामांना मंजुरी दिली. औटघटकेचे का होईना सभापतीपद मिळाल्याने मडिगेरी यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.