Pimpri : चंद्रभागा जगताप यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – महात्मा जोतीबा फुले मंडळ चिंचवडगाव यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कराने चंद्रभागा ज्ञानदेव जगताप यांचा गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 6) चिंचवड येथे पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, तसेच शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्त्री-पुरुष शिक्षण व समानतेसाठी काम करणा-या स्त्री रत्नांचा चिंचवडगाव येथील महात्मा जोतीबा फुले मंडळाच्या वतीने गौरव करण्यात येतो. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 189 व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.