BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी

एमपीसी न्यूज – नाशिक जिल्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील ग्राम सेवा संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत भवारी (पोखरी, ता आंबेगाव, जि पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सचिवपदी अविनाश मुंढे यांची निवड केली आहे. या आशयाचे त्यांना नियुक्ती पत्र संस्थेकडून देण्यात आले आहे.

ग्राम सेवा संस्था तर्फे महाराष्ट्र राज्यात संस्थेचे कार्य व विस्तार करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय कमिटी स्थापन करण्यात येत आहे. चंद्रकांत भवारी हे मानवाधिकार कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतात.

  • तसेच ते समाजाच्या हितासाठी गरीबांसाठी चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय अध्यक्षपदी निवड करण्यात अली आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3